spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महसूल मंत्री यांच्या जनता दरबारात कोळी महादेव जमातीच्या ST प्रमाणपत्रासह सामदा महर्षी वाल्मिकी मठासाठी १६ कोटींच्या प्रस्तावास मंजुरीची उमेश ढोणे यांची मागणी

अमरावती :- अमरावती येथे आज शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबारामध्ये कोळी महादेव जमातीस अनुसूचित जमातीचे (ST) प्रमाणपत्र देण्याबाबत तसेच सामदा महर्षी वाल्मिकी ब वर्ग तीर्थक्षेत्र मठाच्या विकासासाठी शासनास सादर करण्यात आलेल्या रुपये १६ कोटी निधीच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली.

ही मागणी उमेश ढोणे महासचिव म.कृती स. यांनी जनता दरबारात निवेदनाद्वारे मांडली. कोळी महादेव समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राबाबत अनेक वर्षांपासून अडचणी येत असून, याबाबत शासन स्तरावर स्पष्ट व सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी ढोणे त्यांनी यावेळी केली.

तसेच महर्षी वाल्मिकी मठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनास प्राप्त झालेला रुपये १६ कोटींचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असून, तो तातडीने मंजूर करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. सदर निधी मंजूर झाल्यास मठाच्या पायाभूत सुविधा, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

महसूल मंत्री महोदयांनी सदर मागण्यांची दखल घेत संबंधित विभागांकडून आवश्यक माहिती मागवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Popular Articles