Tuesday, March 10, 2026
spot_imgspot_img
spot_img

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कवाडे कुटुंबीयांना सांत्वन भेट

नागपूर :- आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्व प्रा. रंजना कवाडे यांच्या निधनानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कवाडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले. नागपूरातील लक्ष्मीनगर येथील निवासस्थानी जाऊन त्यांनी प्रा. रंजना कवाडे यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली तसेच कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. दिवंगत प्रा. रंजना कवाडे या लाँग मार्चचे प्रणेते, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पत्नी होत्या. तसेच पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे यांच्या त्या मातोश्री होत्या.

या भेटीदरम्यान गडकरी यांनी कवाडे कुटुंबीयांशी काही काळ संवाद साधत रंजनाताई यांच्या सामाजिक कार्याची आठवण काढली आणि त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीतील एक जिव्हाळ्याचे आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी कवाडे कुटुंबातील प्रतिमा जयदीप कवाडे, नीरजा कवाडे, अस्मिता कवाडे उपस्थित होते. तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, विदर्भ अध्यक्ष विजय पाटील, नागपूर शहर अध्यक्ष कैलाश बोम्बले, शहर कार्याध्यक्ष संजय सूर्यवंशी, नागपूर युवक आघाडी जिल्हाध्यक्ष पलाश ठवरे, दक्षिण-पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्निल महल्ले, दक्षिण नागपूर विधानसभा अध्यक्ष प्रजोत कांबळे, दक्षिण-पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष श्रेयस गाडलिंगे, साहिल ठवरे, प्रवेश ठवरे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com