spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रामटेक विधानसभा क्षेत्रातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागपूर येथे स्वगृही जाऊन दिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

किशोर साहू, मौदा :- आज बुधवार (ता. 27 मे) ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील स्वगृही वाढदिवस साजरा करण्यात आला. गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील ,राज्यातील, देशातील नेते ,पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रमंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. रामटेक विधानसभा क्षेत्रातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागपूर येथील त्यांच्या स्वगृही जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, चाचेर मंडळाचे अध्यक्ष रवी चव्हाण, माजी उपसभापती खेमराज चाफले,कोषाध्यक्ष लीलाधर घाटबांधे, सरपंच संकेत झाडे,सुरेश भिलकर,आक्रोश पानतावणे, किरण बरबटे, जीवन टाले, योगेश पायतोडे, पुरुषोत्तम रंधई, राजू पायतोडे, अनिल पायतोडे, प्रवीण पायतोडे, अशोक बावनकुळे, मंगेश चाफले, युवा मोर्चा अध्यक्ष सुभाष मेश्राम,सीनु बुरुकपल्ली,गजानन मेश्राम, माजी सरपंच आनंद लेंडे, महामंत्री चांगदेव येळणे आणि चाचेर मंडळाचे भाजपाचे असंख्य कार्यकर्ते वाढदिवसाला उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.