spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दोन दिवसीय जिल्हा दौरा

यवतमाळ :- केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे दि.19 व 20 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रमानुसार दि.19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता उमरखेड येथील जी. एस सारडा राजस्थानी भवन येथे सत्कार समारंभ कार्यक्रमाला उपस्थिती, रात्री 8.45 वाजता कै. गोविद मेश्राम, चंद्रामणी बौध्द विहार, नेताजी नगर यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट, त्यांनतर शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे मुक्काम करतील.

दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या योजनांबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेसमवेत बैठक, दुपारी 12 श्री. सत्य साई संजिवण नेत्र हॉस्पीटल, वाघापूर येथील ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन, दुपारी 1 वाजता राधामंगल कलर्स हॉटेल, कॉटन मार्केट चौक, धामणगाव रोड, यवतमाळ येथे पत्रकार परिषद, दुपारी 3 वाजता राधामंगल कलर्स हॉटेल येथे जनतेशी भेट वार्ता, सांयकाळी 5 वाजता राधामंगल कलर्स हॉटेल येथे स्थानिक नेत्यांशी चर्चा, त्यानंतर नागपूरकडे प्रयाण करतील.

Popular Articles