नागपूर :- रा. तू. म. नागपूर विद्यापीठ तर्फे २०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून विज्ञान स्नातक करीता ३-२-१ ही नवीन अभ्यासक्रम पद्धती लागू केलेली आहे. सदर अभ्यासक्रमाबाबत विषय शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, नियमावली कळावी या उद्देशाने प्राध्यापकांसाठी एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे रविवार दिनांक २० सप्टेंबर २०२६ ला आयोजन करण्यात आले होते. दादा रामचंद बाखरू सिंधू महाविद्यालय नागपूर, धरमपेठ म. पा. देव विज्ञान महाविद्यालय नागपूर, भालेराव विज्ञान महाविद्यालय सावनेर येथील वनस्पतीशास्त्र विभाग आणि रा.तू. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळ यांचे संयुक्त विद्यमाने सिंधू महाविद्यालयात या कार्यशाळेचे आयोजन केल्या गेले.

उदघाटन सत्राचे अध्यक्षपद डॉ. बालाजी राजूरकर यांनी भूषविले तर सिनेट आणि व्यवस्थापन सदस्य डॉ. योगेश भुते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. चर्चासत्राचे समन्वयक डॉ. विलास डोईफोडे, सहसमन्वयक, प्राचार्य डॉ. पितांबर हुमणे, आयोजन सचिव डॉ. राजकुमार खापेकर, डॉ. महेश कावळे, डॉ. मौसमी भोवाल यांनी उपरोक्त नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाविषयी सखोल आणि प्रभावी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व प्राध्यापकांनी गटचर्चेत सक्रिय सहभाग घेऊन महत्वाच्या सूचना केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. खापेकर तर संचालन व आभारप्रदर्शन डॉ. संदीप हाते यांनी केले. विद्यापीठ कक्षेतील सत्तर प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदवून वेळोवेळी अशा आयोजनाची इच्छा व्यक्त केली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक डॉ. रुपेश बडेरे, डॉ. व्ही. एम. पेंडसे, डॉ. एस. पी. डोंगरे, डॉ. अश्वजित फुलझेले, डॉ. नयना शिरभाते, डॉ. प्राची लांबट, डॉ. मेघा भांबरी, डॉ . परेश निनावे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





