spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एका राज्यात २ नियम का ?

– शिवसेना नगरसेवक ललित खंडेलवाल यांचा घरचा अहेर

– अमरावती, पुणे, सातारा ला परवानगी तर नागपूर ला का नाही ?

मोवाड :- सध्या महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यात राज्यात अनेक ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येते आहे. यामध्ये विशेषता डीजे , धुमाल ला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये पुणे , अमरावती, सातारा मध्ये जिल्हाधिकारी यांनी विशेष आदेश काढून डीजे परवानगी दिली आहे. पण मात्र मुख्यमंत्री व केंद्राचे केंद्रीय मंत्री असलेल्या नागपूर जिल्ह्यात मात्र डीजे ला परवानगी दिली गेली नाही. त्यामुळे एक राज्यात २ नियम कसे असा प्रश्न शिवसेना नगरसेवक ललित खंडेलवाल यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे नागपूर महाराष्ट्राच्या बाहेर की भारताबाहेर आहे असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे सत्ता धारी पक्षात जुगलबंदी पाहायला मिळत आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर आज असते तर संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू सणावर डीजे बंदी करता आली असती का असा सवाल केला आहे.

जिल्हाधिकारी यांनी नागपूर जिल्ह्यात विशेष आदेश जारी करून डीजे ला परवानगी द्यावी अशी मागणी देखील यावेळी शिवसेना नगरसेवक ललित खंडेलवाल यांनी केली आहे. हिंदू विचारसरणी च सरकार राज्यात नी केंद्रात आहे. त्यामुळे नक्की सरकार हिंदू सणावरील बंदी उठवत डीजे व धुमाल साठी ४ बेस व ४ टॉप ची परवानगी देतील अशी आशा व्यक्त केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.