spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वराडा केंद्राची शिक्षण परिषद संपन्न

कन्हान ३१ : –  नुकतिच वराडा केंद्राची शिक्षण परिषद संपन्न झाली. यात आयोजक वामन पाहुणे केंद्रप्रमुख वराडा यांच्या नियोजनानुसार कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि. प. प्राथमिक शाळा कांद्री येथील मुख्याध्या पिका
रंजना संगेवार  तसेच प्रमुख अतिथी म्हणुन मोतीराम रहाटे, ज्योती रघटाटे, ललिता लांजेवार उपस्थित होत्या.
      तज्ञ मार्गदर्शक म्हणुन तीन शिक्षकांनी वेगवेगळ्या तीन विषयावर मार्गदर्शन केले. विषय क्र.१ नुसार  प्रमोद चांदेकर  को.खदान यांनी शिष्यवृत्तीसाठी एक तासिका या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. विषय क्र.२ नुसार
कल्पना लाड गोंडेगाव यांनी नवोदय परिक्षा सराव या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच विषय क्र.३ नुसार  विश्वास पांडे  हे एसंबा यांनी अध्ययन अध्यापनात डिजिटल साहित्या चा उपयोग व फायदे या विषयावर मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेला गटशिक्षण अधिकारी  सुनील कोडापे  यांनी भेट दिली व मार्गदर्शन केले. व समाधान व्यक्त केले.
         या शिक्षण परिषदेचे संचालन सहारे  कांद्री यांनी तर आभार प्रदर्शन रामटेके मॅडम कांद्री यांनी केले. शिक्षण परिषदेच्या यशस्वितेकरिता यावलकर , नासरे, गोपनारायण, भगत, भिमटे, पानतावणे मॅडम आदीनी सहकार्य केले. शिक्षण परिषदेला केंद्रातील ९ जिल्हा परिषद शाळा व ५ खाजगी शाळेतील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.