चाचेर येथे आज ऋषीपंचमीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
123
oppo_2
किशोर साहू : मौदा ,ता. २८: दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील सांड व भागी या दोन नद्यांच्या
श्रीक्षेत्र संगम चाचेर येथे सार्वजनिक ऋषी पंचमी महिला उत्सव समितीतर्फे ऋषिपंचमीनिमित्त उद्या गुरुवार (दि. 28) ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे संपूर्ण चाचेर नगरी स्वागतद्वाराने सजवण्यात आलेली आहे व चौकाचौकात शुभेच्छांचे फलकही लावण्यात आलेले आहे. भक्तगणांच्या सोयीसाठी कार्यक्रमाच्या स्थळावर पेंडल लावण्यात आला असून सर्व व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आलेली आहे. उद्या गुरुवार सकाळी 7 वाजता नागद्वारच्या भक्तगणांमार्फत  महाआरती, 9 ते 12 वाजता ह भ प कु. दिपाली आसटकर यांचे कीर्तन, त्यानंतर लगेच श्री संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळा व कार्यक्रमाच्या समारोप महाप्रसादाने करण्यात येणार आहे ,तरी या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक नवदुर्गा महिला भजन  मंडळाचे पदाधिकारी तुळसा अढाऊ, छाया कुल्लरकर ,सुनंदा वानखेडे, ज्योत्सना साखरवाडे, वनश्री टेंभरे ,सोनू अढाऊ, हिरा टेंभरे ,मीरा जांबुतकर ,कुसुम अढाऊ, जयश्री वानखेडे सह रेवा अढाऊ,  विष्णू टेंभरे ,शिवशंकर साखरवाडे, आश्विन वानखेडे,  चरणदास बावनकुळे सह समस्त भक्तगण परिश्रम घेत आहे.