किशोर साहू, मौदा :- मागील पंधरा वर्षांपूर्वीपासून निमखेडा येथील बसस्थानक चौकात सार्वजनिक नवयुवक दुर्गा उत्सव मंडळातर्फे दुर्गा देवीची स्थापना करण्यात येऊन विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही बस स्थानक चौकात दुर्गा देवीची स्थापना करण्यात येऊन भजन, कीर्तन, पारायण सह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष विनोद बिसेन, उपाध्यक्ष जगदीश राठी ,सचिव जितेंद्र खेरगडे, सदस्यगण बळीराम बरबटे, रोशन महादुले, उमेश शेंडे ,डुलिचंद पटिये ,कमल सूरय्या, हेमराज हारोडे परिश्रम घेत असून समस्त ग्रामवासी सहकार्य करत आहे.



