Home Latest News कामठीत 14 ऑगस्ट ला पूज्य भन्ते विनाचार्य यांची भव्य धम्मध्वज यात्रा व...

कामठीत 14 ऑगस्ट ला पूज्य भन्ते विनाचार्य यांची भव्य धम्मध्वज यात्रा व जनसंवाद

0
139

 

कामठी ता  १४ :- बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला  बळ  देणे आणि लोकांना संघटित करणे या उद्देशाने 14 ऑगस्ट ला दुपारी 2 वाजता  कामठी येथील जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बौद्धगया मुक्ती आंदोलनाचे प्रणेते पूज्य भन्ते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली भव्य धम्मध्वज यात्रा व जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.तेव्हा या जनसंवाद कर्यक्रमात जास्तीत जास्त संख्येतील बौद्ध उपासक व उपासिका  तसेच नागरिकांनी प्रामुख्याने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक  माजी नगरसेवक  नीरज लोणारे  तसेच माजी नगराध्यक्ष गुड्डू
मानवटकर, माजी नगरसेविका ममता कांबळे,आशिष मेश्राम,दिपंकर गणवीर,सुमित गेडाम, दिनेश पाटील, नागसेन सुखदेवें, आनंद गेडाम,अनुभव पाटील,गीतेश सुखदेवें,राजन मेश्राम, विकास रंगारी,रायभान गजभिये, आदीनी केले आहे.