spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खात येथील विहिंप चे जिल्ह्यातील पदाधिकारी लोकेश राखडे यांच्या त्यांच्या समर्थकांसह राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

किशोर साहू, मौदा :- खात पंचायत सर्कल मधील सामाजिक क्षेत्रातील काम करणारे विहिंपचे जिल्ह्यातील पदाधिकारी लोकेश राखडे यांनी त्यांच्या सर्व समर्थकांसह व घोटमुंढरी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आज सोमवार (दि. 20 ऑक्टोबर) ला राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून आणि शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून राखडे , त्यांचे समर्थक व घोटमुंढरी येथील सामाजिक कार्यकर्त्ये यांनी प्रवेश केल्याचे सांगितले.

याप्रसंगी अर्थ ,कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी मौदा पंचायत समिती सभापती मनोज कोठे, श्रीहरी थोटे, कुंडलिक गिरीपुंजे, लवा पटले उपस्थितीत होते.

Popular Articles