नागपूर :- विदर्भ खैरे कुणबी विवाह मंचाची सन २०२६ ची वार्षिक सभा सोमवारी २० जुलैला महाजन साहेब यांच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेमध्ये मंचाच्या आगामी वाटचालीसंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. सन २०१९ पासून समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या विदर्भ खैरे कुणबी विवाह मंचाने समाजातील विवाह इच्छुक युवक-युवती व त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन आणि समन्वय साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असून, आगामी काळातही ही सेवा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. यासभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष- स्वप्निल रोहणकर- उपाध्यक्ष- सुरेखा रडके- संघटक-महादेव वैद्य- सचिव-डॉ. प्रदीप महाजन सहसचिव-डॉ. तुकाराम धोबे, कोषाध्यक्ष-पुंडलिक ठाकरे, सहकोषाध्यक्ष- राजीव धानोरकर- सदस्य- रामरतन देशमुख, विलास चिंचोलकर, पंकज कोटगुले व उमेश नवघरे. हि निवड ॲड. अभय जिचकार, महादेव वैद्य, मोहन डंभारे, टेमराज माले, डॉ. प्रदीप महाजन, स्वप्निल रोहणकर, विनायक म्हस्के, रामरतन देशमुख, सुनील मगरे, दिलीप शहारे, विलास चिंचोलकर, सुरेखा रडके, प्रगती महाजन, कल्पना रडके, उषा देशमुख आणि संगीता पुसदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबविणे, विवाह मंचाची कार्यव्याप्ती वाढविणे, युवक-युवती व पालकांना अधिक प्रभावी सेवा उपलब्ध करून देणे तसेच समाजातील एकोप्याला बळकटी देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. उपस्थित सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली विवाह मंच समाजहिताचे कार्य अधिक जोमाने व प्रभावीपणे पुढे नेईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
विदर्भ खैरे कुणबी विवाह मंचाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न ; नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड









