– राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भव्य स्पर्धेचे आयोजन !
– विजेत्यांना मिळनार रोख पारितोषिकांसह मेडल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शिक्षण प्रसारक मंडळ, वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी आणि सुशगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय ‘आझादी की दौड’ स्पर्धेचे आयोजन शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेत विदर्भातील विद्यार्थी व धावपटूंना सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या स्पर्धेत ५ किलोमीटर व ३ किलोमीटर अशा अंतरांच्या धावण्याच्या स्पर्धा होणार असून, दोन वयोगटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
‘अ’ गट : १६ वर्षांवरील खुला गट या गटात मुले व मुली असे दोन विभाग राहणार आहेत. प्रत्येक विभागातील विजेत्यांना पुढीलप्रमाणे रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत : प्रथम — ५,००० रुपये द्वितीय — ४,००० रुपये तृतीय — ३,००० रुपये चौथा — २,००० रुपये
पाचवा — १,००० रुपये यासोबतच मेडल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
‘ब’ गट : १२ ते १६ वर्षांखालील या गटातही मुले व मुली असे दोन विभाग असतील. प्रत्येक विभागातील विजेत्यांना प्रथम — ३,००० रुपये द्वितीय — २,५०० रुपये तृतीय — २,००० रुपये चौथा — १,५०० रुपये पाचवा — १,००० रुपये अशी रोख पारितोषिके तसेच मेडल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
सर्व वयोगटांतील पहिल्या पाच खेळाडूंना मेडल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
विदर्भातील धावपटूंना सहभागी होण्याचे आवाहन
स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू असून २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा व गोंदिया यांसह विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून धावपटूंनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. त्यामुळे स्पर्धेला विदर्भातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विदर्भातील अधिकाधिक विद्यार्थी व धावपटूंनी ‘आझादी की दौड’मध्ये सहभागी होऊन आपल्या क्रीडागुणांना वाव द्यावा, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयराव मुकेवार व सुशगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष प्रदीप भाऊ बोनगिरवार यांनी केले आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, उपप्राचार्य प्रा. पुरुषोत्तम गोहोकार, मुख्य संयोजक तथा शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक प्रा. उमेश व्यास, क्रीडा शिक्षक प्रा. कमलेश बावणे, सुशगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे क्रीडा शिक्षक गौतम जीवने यांच्यासह दोन्ही संस्थांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.








