spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विदर्भ स्तरीय महिला कलावंत गौरव संमेलन

यवतमाळ / प्रतिनिधी :- येथे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्सव मंगल कार्यालय येथे १५ मार्चला उत्साहात संपन्न महाराष्ट्रात पहिल्यांदा विदर्भ स्तरीय महिला कलावंत गौरव संमेलन आयोजीत करण्यात आले होते.

यवतमाळ येथे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने आयोजित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दिंडी काढून करण्यात आली. दिंडीमुळे परिसरात उत्साहाचे आणि सांस्कृतिक वातावरणाचे दर्शन घडले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून रेखा कोठेकर, सिमा बिन्नोड तसेच विपुल खंडेलवाल (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल लाड यांनी प्रभावीपणे सादर केले. त्यानंतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात सोमनाथ गायकवाड यांनी कलावंतांच्या हक्कांबाबत मार्गदर्शनपर विचार मांडले.

यानंतर विविध कलावंतांनी कलेचे सादरीकरण केले. यामध्ये सितारवादन, नृत्य, तबलावादन, भारुडे तसेच काव्यवाचनाचा समावेश होता. उपस्थित प्रेक्षकांनी या कलाविष्कारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचे मनापासून कौतुक केले. सोमनाथ गायकवाड यांच्या हस्ते कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलावंतांचा सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला, ज्यामुळे कलाकारांचा उत्साह द्विगुणीत झाला. निमंत्रण समितीच्या माध्यमातून हेमलता वैद्य, चारुलता पावशेकर, मालती गावंडे, दिपाली अग्निहोत्री, दुर्गा निमकर, कांता पवार, शीतल नानेटकर, शिल्पा बेगडे, मेघा महल्ले, विजया शिरभाते, लीनता गिरोळकर, अर्चना वाळके, दुर्गा पटले व प्रेमा पत्रीवार यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. कार्यक्रमाच्या कार्यकारिणीत मनोज नानेकर, सुखदेव लीलारे, बापूराव रंगारी, मधुसूदन कोवे, गुणवंतराव लडके, किशोर इंगोले, विनायकराव माने, दिगंबरराव गाडगे, श्रीकांत माळवी, मुक्तरंग सोनटक्के, पवन आत्राम, उमेश पाटील व विनायक मेश्राम यांच्यासह सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संचालन कविता भोयर व दिपाली अग्निहोत्री यांनी प्रभावी शैलीत केले, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक शीतल लाड यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार मनीषा धोणे यांनी करत सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.