Home Latest News फुटबॉल राष्ट्रीय चॅम्पियनशीप च्या अंतिम सामन्यात विदर्भ टीम विजयी

फुटबॉल राष्ट्रीय चॅम्पियनशीप च्या अंतिम सामन्यात विदर्भ टीम विजयी

0
2

– नगरसेवक काशिनाथ प्रधान यांचे सुपुत्र ओजस चे सुयश,

– फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्वर्णपदकाने विजयश्री संपादन 

कामठी :-1 ते 3 मे दरम्यान रायपूर,छत्तीसगढ येथे 12 वर्षे वयोगटातील फुटबॉल खेळाडुची आयोजित 11 वी नॅशनल नाईन-ए- साईड फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामन्यात उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शन करीत कामठी येथील स्कुल ऑफ एडिफाय च्या विद्यार्थ्यांच्या विदर्भ टीमने सुवर्ण पदक प्राप्त करून विजयश्री चे यश संपादन केले. या टीम मध्ये कामठी नगर परिषद चे विरोधी गट नेता नगरसेवक काशिनाथ प्रधान यांचे सुपुत्र ओजस काशिनाथ प्रधान सह सौरीत भोयर,नमन दिपाणी,परम जांभुळकर, यांचा समावेश आहे.

कामठी शहराला फुटबॉल ची नर्सरी संबोधले जाते.या शहरातून मोठमोठे नामवंत खेळाडू उदयास आले क्रीडानगरी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या कामठी शहरातील 12 वर्षीय ओजस काशिनाथ प्रधान ने तीन दिवस आई वडिलापासून दूर राहून खेळण्याची जिद्द बाळगून आणि जिंकनारच असा ठाम निर्धार मनात कायम ठेवला व फुटबॉल च्या राष्ट्रीय स्पर्धेत विजयश्री प्राप्त करून यश संपादन करून फुटबॉल टीम सह स्कुल ऑफ एडिफाय तसेच शाळेचे मुख्याध्यापक ,व आई वडिलांचे व कामठी शहराचे नाव प्रसिद्ध केले.या यशाचे श्रेय विदर्भ टीम चे कॅपटन मंगेश पौणिकर सह स्कुल ऑफ एडिफाय व शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षकगणआई वनिता व वडील काशिनाथ प्रधान यांना दिले आहे.

सुवर्णपदक प्राप्त केलेल्या विदर्भ टीम व ओजस काशिनाथ प्रधान वर ओजसच्या आई वडीलासह मोठे पप्पा शिवदास प्रधान, नगरसेवकगण व सोनेगाव ग्रा प चे माजी सरपंच चंद्रशेखर हेवट, माजी सरपंच प्रवीण कुथे, खैरी ग्रा प चे माजी सरपंच व विद्यमान सदस्य बंडू कापसे, निकेश लोन्दासे, प्रदीप साखरकर, आशिष मेश्राम,नागसेन सुखदेवें,

सुमित गेडाम आदींनी अभिनंदनाचा वर्षाव करीत कौतुक केले.