सचिन चौरसिया रामटेक १६ : कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स, रामटेक येथे शनिवार (दि.१२) ला एक दिवसीय व्हर्च्युअल लॅब कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात विविध महाविद्यालयातील १५३ प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भाग घेतला. उद्घाटन प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांचे हस्ते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन वर्चुअल लॅब आयआयटी दिल्लीचे शनिकुमार, सीनिअर फील्ड अभियंता अबेद मुस्ताक, समन्वयक डॉ. सतीश भेले, आयक्यूएसी डीन डॉ.यशवंत जिभकाटे विभागप्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये विविध अभियांत्रिकी प्रयोगांचा आभासी अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील उपकरणांचा डिजिटल वापर करून प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे. कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग ऑनलाईन पद्धतीने हाताळण्याचा सराव व विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशाळेबद्दल आत्मविश्वास निर्माण केला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले. प्रस्तावना डॉ. सतिश भेले, आभार व धन्यवाद प्रा. अंजली नरड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते करीता डॉ. शिल्पा आष्टणकर, डॉ. मिनाक्षी चौरागडे, डॉ. स्नेहल मालोदे, प्रा. हर्षिता जैन, प्रा. किष्णा पडोले, प्रा के. नागराजू यांनी प्रयत्न केले.




