spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

देवेंद्र फडणवीस यांनी आरंभलेल्या विकास यात्रेवर ग्रामीण भागातील मतदारांनी व्यक्त केला विश्वास – ॲड. धर्मपाल मेश्राम

– महाराष्ट्रातील जिल्हा परिषदवर भाजपा महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेले यश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरंभलेल्या विकास यात्रेवर ग्रामीण भागातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.

महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदेतील एकूण 731 जागांपैकी 661 जागांचा कल जाहीर झाला असून यात भाजप ने 236, शिवसेना 140, राष्ट्रवादी काँग्रेस 151 जागांसह निर्विवाद यश मिळवले.

यासोबतच 125 पंचायत समितीच्या 1462 पैकी 1215 जागांचे निकाल जाहीर झाले. यात देखील भाजपा महायुतीने घवघवित विजय मिळवला आहे. या निकालात भाजप ने 410, शिवसेना 270, राष्ट्रवादी काँग्रेसने 305 जागांवर विजय संपादित करून विक्रम प्रस्थापित केला.

125 पंचायत समिती पैकी 50 च्या जवळपास भाजपाने एकहाती झेंडा फडकवला आहे. तर 60 च्या वर महायुती चा झेंडा आहे तर काँग्रेस, उबाठा 10 च्या आत सामावले आहेत.

हे यश महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपावर जनतेच्या असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, असेही  मेश्राम म्हणाले.

Popular Articles