spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मतदारांनो लक्ष द्या! आता ‘बीएलओ’ येणार तुमच्या दारी; मतदार यादी पडताळणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन”

हंसराज भंडारा :- भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून मतदारांचे यापूर्वी झालेल्या (सन-२००२) विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या अतिंम यादीतील मतदारांची २०२४ च्या मतदार यादीतील मतदाराची जिल्हयातील 60-तुमसर, 61-भंडारा व 62-साकोली विधानसभा मतदार संघातील 10,10,788 मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी जाऊन Enumeratin Form चे वाटप करणार आहे. याबाबत जिल्हयातील मतदारांना आवाहन करण्यात येते की, विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमा अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन सावन कुमार,भाप्रसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.

Popular Articles