spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वनविभाग यांच्या वतीने वृक्षदिंडी व वनमहोत्सव उत्साहात

सचिन चौरसिया, रामटेक :- पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी वन विभाग नागपूर सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र रामटेक यांच्या वतीने समर्थ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रामटेक येथे वनमहोत्सवानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर हरित संदेशाने दुमदुमून गेला. परिसरातून भव्य वृक्षदिंडीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात पर्यावरण संरक्षणाचे संदेश देणारे फलक घेऊन “झाडे लावा, झाडे जगवा”, “वृक्ष वाचवा-पर्यावरण वाचवा” अशा घोषणा देत परिसरात जनजागृती केली. वृक्षदिंडीनंतर महाविद्यालयाच्या परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्यां एम.एन.लोखंडे यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाकडून वनपाल के.डी.श्रीरंग, आर.आर.शुक्ला, वनरक्षक एस.एस.हांडे, एफ.जे.आझमी तसेच वनमजूर एस.आर.भोयर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना वनपाल आर.आर.शुक्ला यांनी वृक्षांचे पर्यावरणीय संतुलन राखण्यात असलेले महत्त्व अधोरेखित केले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पाण्याची समस्या यांवर मात करण्यासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख रंधई यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular Articles