spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाघाये महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ शिबिराचे मोरगाव येथे उत्साहात उद्घाटन; ‘युथ फॉर डिजिटल लिटरसी’चा जागर

हंसराज, प्रतिनिधी भंडारा लाखनी :- वाघाये महाविद्यालयाच्या वतीने ‘युथ फॉर डिजिटल लिटरसी’ (डिजिटल साक्षरतेसाठी युवा) या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजनेचे (रासेयो) सात दिवसीय विशेष निवासी शिबिर मोरगाव/राजे येथे आयोजित करण्यात आले आहे. १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या शिबिराचे भव्य उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. गणेश एम. कापसे होते. शिबिराचे उद्घाटन मोरगावच्या सरपंच गायत्री वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच मनोहर पटले, माजी सरपंच नाजूक भैसारे, ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश भैसारे, पूनम पारधीकर, रजनी वालकर, पोलीस पाटील सुरेश राऊत, ग्रामपंचायत अधिकारी राजे ढवळे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र धारणे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. पुण्यशील एस. टेंभुर्णे, प्रा. डॉ. चंद्रशेखर देवघरे आणि प्रा. डॉ. मंगेश वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते.

उद्घाटक गायत्री वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक, सामाजिक, बौद्धिक आणि नैतिक असा सर्वांगीण विकास होतो. अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची ओढ निर्माण होते.” उपसरपंच मनोहर पटले यांनीही आपले विचार मांडताना सांगितले की, शिबिरामुळे विद्यार्थ्यांना चांगली शिस्त लागते आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळतो.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव व्हावी आणि त्यांना चांगल्या सवयी लागाव्या, या उद्देशाने महाविद्यालय दरवर्षी अशा विशेष शिबिरांचे आयोजन करते. या शिबिरातून विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक म्हणून घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. सागर वारंगणे, प्रा. तुषार डोंगरवार, विद्यार्थी प्रतिनिधी व माजी विद्यार्थी चेतन वाघमारे, पुरुषोत्तम हटवार यांच्यासह सर्व स्वयंसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. पुण्यशील एस. टेंभुर्णे यांनी केले, तर उत्कृष्ट संचालन प्रा. श्रद्धा बोरकर यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. रूपचंद डोंगरवार यांनी मानले. मोरगाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या पार पडला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.