नागपूर :- हर्ष ए. पोहार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अंकुश माने, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी बोरी येथील दाखल अप. क्र. १६२/२०२४, कलम ४५४, ४५७, ३८०, ४११, ३४ भादंवि या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अरुण माणिक नागोसे, वय ३७ वर्षे, रा. सखी (खुर्द), पोस्ट वरव, ता. राळेगाव, जि. यवतमाळ याचा शोध घेवुन त्याला अटक केली आहे.
नागपूर ग्रामीण जिल्हयातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध मोहीम राबवित असतांना त्यांना मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुरावे याचे सखोल विश्लेषन करून दिनांक २३/११/२०२६ रोजी सदर गुन्हयातील आरोपी अरुण माणिक नागोसे, वय ३७ वर्षे, रा. सखी (खुर्द), पोस्ट वरव, ता. राळेगाव, जि. यवतमाळ याला सापळा रचून मौजा सखी (खुर्द), ता. राळेगाव जि. यवतमाळ येथुन ताब्यात घेतले. सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे.






