spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रभाग क्र. ८ मधिल ज्वलंत समस्या तात्काळ सोडवा – नगरसेविका लता लुंढुरे

कन्हान :- नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत प्रभाग क्र. ८ विवेकानंद नगर, शिवाजी नगर येथील विविध समस्या तात्काळ सोडविण्या करिता न प मुख्याधिकारी घोडके हयाना निवेदन देऊन नगरसेविका लता लुंढुरे हयानी मागणी केली आहे.

नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र. ८ स्वामी विवेकानंद नगर व शिवाजी नगर येथील सार्वजनिक नालीवर झाकण नसुन नाल्या उघडया आहेत. रस्त्या चे बांधकाम व पेव्हरब्लॉक बसवुन उघड्या नालीवर झाकण बसविण्यात यावे तसेच मोकाट डुकरांचा बंदो बस्त करण्यासह विविध प्रकारच्या समस्या सोडविण्या करिता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक घोडके यांना नगरसेविका लता लुंढेरे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी कन्हान नगरपरिषदेचे विरोधी पक्ष न.प. गटनेते हरिश तिडके, प्रदीप गायकवाड, अभिजीत चांदुरकर, सरिता कुर्वे आदी सह नागरिकांनी प्रामुख्याने उपस्थित राहुन प्रभाग क्र. ८ मधिल समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्या त आली आहे.

Popular Articles