spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अनधिकृत बांधकाम/प्रार्थना स्थळ,धर्मांतरण थांबवण्यासाठी करण्याचा इशारा

– जर यावर कोणतीच कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा !

१) शिव शंभूनगर, नवकन्या नगर भरतवाडा रोड. मौजा भरतवाडा खसरा क्र. ४०/१ भूखंड क्र. १७,१८, आणि १९ या जागेवर अनधिकृत बांधकाम झाले आहे.

२) कारण सांगतो की मागील 29 मार्च ला आम्हाला सूचना मिळाली की शिव शंभू नगरात एक अनधिकृत प्रार्थना स्थळाच बांधकाम सुरू आहे. आम्ही तिथे जाऊन शाहानिशा केली! तर लक्षात आलं. की सदर जागा ही प्रार्थना स्थळच आहे. आम्ही लगेच 100 नंबर वर आधी कॉल केला. कळमना पोलिसांनी आम्हाला सांगितलं. की तुम्ही तिथे थांबू नका ! काय तक्रार करायची आहे. ती ठाण्यात येऊन करा.

मग आम्ही श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या माध्यमातून एक तक्रार लिहिली आणि पोलिसांना लवकरात लवकर कारवाही करण्याची मागणी केली. मी वाचून दाखवतो,

३) या तक्रारीच उत्तर म्हणून कळमना पोलिसांनी 2/5/2025 रोजी आम्हाला एक उत्तर पत्रिका आणि एक नोटिस दिली. वाचून दाखवतो,

4) उत्तर पत्रिकेत पोलिसांनी स्पष्ट भाषेत नमूद केल. आहे की हा विषय (MNC) आणि (NIT) चा आहे. बरं ठीक आहे.

५) पण आम्ही तिथे गेल्या गेल्या पोलिसांना माहिती दिली. कोणत्याच प्रकारची जीवे हानी,तोडफोड न करता शांत पने पोलिसांना सूचना दिली.दुसर अजून काय करायला पाहिजे होत.

अनधिकृत बांधकामावर कारवाही करण्या ऐवजी उलट माझ्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची नोटिसे पाठली! हे काय चालू आहे. वाचून दाखवतो,

६) बरं हे पण सोडा. मग पोलिसांनी बोट NMC कळे केलं मग 25/7/2025 ला आम्ही त्यांना पोलिसांचे उत्तर पत्र देऊन कारवाही करण्यास सांगितले.

काही दिवसांनी त्यांनी (NIT) कळे बोट केलं.

मग त्यांनी स्मार्ट सिटी कळे बोट केलं त्यांना विचारलं तर त्यांनी काही दिवसात कारवाही करतो सांगितल. 30/7/2025 ला त्यांना पण पत्र दिलं. मग अजून काही दिवसांनी म्हणजे 3/8/2025

ला स्मार्ट सिटी स्पष्ट भाषेत हे पत्र देते की हा विषय MNC चाच आहे. पत्र वाचून दाखवतो.

७) 25/8/2025 ला आम्ही शेवटी त्रासून त्यांना सरळ भाषेत सांगितलं की जर येत्या 10/9/2025 पर्यंत कारवाही होत नसेल तर! श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सकल हिंदू समाज मिळून आम्ही इथे तीव्र निषेध प्रदर्शन करू हे आम्ही प्रशासनाला सोसियल मिडिया च्या माध्यमातून कडवळ होत तरी पण तेच.

तारीख 26/9/2025 तरी पण अजून एक वीट पण तेथून हटली नाही.

८) पत्रकाराच्या माध्यमातून आमचं प्रशासनाला येवढच म्हणणं आहे. की! सदर बांधकाम अनधिकृत असून पण त्या वर कारवाही का होत नाही. काय अडचण आहे. असा आमचा म्हणजेच श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान चा प्रश्न प्रशासनाला आहे.

९) प्रशासनांनी याच उत्तर दयाव व लवकरात लवकर कारवाही करावी. अन्यथा हा विषय पूर्ण पूर्व नागपूर शहराला माहीत आहे. जर कोणी दुसरी संघटना येऊन तिथे काही कमी जास्ती करेल! तर त्याच जबाबदार श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान नागपूर विभाग राहणार नाही. त्या घटनेच जबाबदार स्वतः प्रशासन असतील. आणि तुमच्या माध्यमातून पण जर कारवाही झाली नाही तर एक मोठ आंदोलन श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सकल हिंदू समाज मिळून मिसळून करण्याचा इशारा त्र्यबेक आमधरे यांनी पत्र परिषदेत दिला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.