कन्हान :- शहरात पहिल्यांदाच कन्हान यूथ फाउंडेशन आणि आनंदधाम फाउंडेशन व्दारे कँप्टन सतीश बेलसरे यांच्या वाढदिवसा निमित्य आयोजित कन्हान युवक आणि कुटुंबांसाठी प्रसिध्द आंतरराष्ट्रीय व्याख्याते भाविन जे. शहा (मुंबई) यानी ” चला आपल्या आई वडिलांचे आभार मानु या ” हया विशेष प्रेरणायी व्याख्यानातुन आई वडिलांच्या अतुट नात्याची गौरव महिमा ने “आई वडिलांचे अंनत उपकार आपण या जन्मी तरी फेडु शकत नाही.” संबोधन करून उपस्थित श्रौत्याना भावनात्मक भावविभुर केले. 

शनिवार (दि.१३) सप्टेंबर २०२५ ला दुपारी ४ वाजता कुलदिप मंगल कार्यालय जे. एन रोड कन्हान येथे कन्हान यूथ फाउंडेशन आणि आनंदधाम फाउंडेशन व्दारे कन्हान युवक आणि कुटुंबांसाठी एक अभुतपूर्व अनुभव प्रसिध्द आंतरराष्ट्रीय व्याख्याते भाविन जे. शहा (मुंबई) जीवन आणि व्यवसाय प्रशिक्षक यांचे ” चला आपल्या आई वडिलांचे आभार मानु या ” ही विशेष प्रेरणादायी व्याख्यान कँप्टन सतीश किशोर बेलसरे यांच्या वाढ दिवसा निमित्य आयोजित करण्यात आला होता. यात आई वडिलांची पुण्या ई की, त्यानी आपल्याला ही दुनिया दाखविली. स्वत: अंनत हालअपेष्टा सहन करून आपण चांगले यशस्वि होऊन त्यांच्या पेक्षा मोठे होऊन नावलौकिक मिळवावा म्हणुन सदैव कार्यरत असतात, त्यामु़ळे आपण दररोज त्यांचे पाय धुवुन तिर्थ म्हणुन पिलो, दररोज दिवसभर धन्यवाद म्हणुन आपण त्यांचे आभार मानु शकतो. परंतु त्यांचे अंनत उपकार या जन्मी तरी फेडु शकत नाही. तसेच विशेष पालकांच्या आशीर्वादाच्या अदृश्य शक्ती मध्ये तरुणा ईची उन्नती असते. जीवनातील संघर्षांना तोंड देण्याची क्षमता. यशासाठी सकारात्मक विचार या विषयावर अभुतपूर्व अनुभवात्मक विशेष प्रेरणायी व्याख्यानातुन उपस्थित विद्यार्थ्यानी पालकांना अलिंगण घालुन अश्रुच्या धारानी भावनात्मक भावविभुर करून आई वडिलांचे अतुट नाते असल्याचे प्रगटन केले. कार्यक्रमास कन्हान परिसरातील विद्यार्थी, युवक आणि पालक, कुटुंबानी मोठया संख्येने उपस्थित राहुन प्रेरणादायी व्याखानाचा लाभ घेतला . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान यूथ फाउंडेशन व आनंदधाम फाउंडे शन आणि कँप्टन सतीश किशोर बेलसरे मित्र परिवारांचे महिला, युवक, पुरूष सदस्य, कार्यकर्त्यानी विशेष परिश्रम घेतले.




