spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तेरा क्या होगा मेरे दोस्त! यशचा वाल्मीक कराडसोबतचा फोटो व्हायरल, बीड पत्रकाराच्या मुलाच्या हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट

बीड: मित्राचा वाढदिवस साजरा करताना झालेल्या वादामुळे यशला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने सारं बीड सुन्न झालं आहे. रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लेकाला जेव्हा त्याच्या वडिलांनी जवळ घेतलं, त्याच्याशी बोलू लागले, हे दृश्य पाहून उपस्थित सारेच हळहळले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली आहे. त्यानंतर शुक्रवारी अत्यंत शोकाकूल परिस्थितीत यश ढाकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, आता या प्रकरणात एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी वाल्मीक कराड जो सध्या बीड येथील कारागृहात आहे. याच वाल्मीक कराडसोबत यश ढाका याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोसोबत, “मैं अपने आप को पुलीस के हवाले कर रहा हुं, अपने पैसे, अपने दबदबे, अपने बल से, मैं तो छूट जाऊंगा.. लेकीन तेरा क्या होगा मेरे दोस्त.. तेरा क्या होगा?” हा डायलॉग शेअर करण्यात आला आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या प्रकरणाचा आणि यशच्या हत्येचा काही संबंध आहे की नाही, याबाबत सध्या कुठलीही अधिकृत माहिती नाही.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.