spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोवाड येथे कचिकुडा एक्सप्रेस ला थांबा कधी मिळणार ?

– रेल्वे स्थानकाचे चित्र बदलेल का ?

– स्थानिक आमदार व खासदार देणार का लक्ष 

– मोवाड नगरपरिषद मध्ये असलेले सत्ताधारी देणार का लक्ष ?

मोवाड :- नरखेड – अमरावती हा रेल्वे मार्ग २०१४ पासून सुरु झाले आहे. पण मात्र कोरोना पासून कचिकुडा एक्सप्रेस चा थांबा बंद करण्यात आला आहे. पण मात्र याबाबत सत्ता पक्ष व विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष नाही. १४ जानेवारी २०२१ पासून कचिकुडा एक्सप्रेस सुरु झाली आहे. ८० महिन्याचा काळ झाला पण मात्र मोवाड येथे कचिकुडा ला थांबा मिळाला नाही. कोरोना काळा अगोदर मोवाड येथे कचिकुडा एक्सप्रेस ला थांबा होता. पण मात्र तो थांबा पुन्हा सुरु करण्यात आला नाही. मोवाड येथून दररोज शेकडो प्रवासी जाने येणे करतात. यात मोवाड सह खैरगाव , देवग्राम , मदना , जलालखेडा , भरसिंगी , गणेशपूर , पोरगव्हाण , उमरी , हिवरा , गोधनी , पांढरी या प्रवास्यांना जाने व येण्या साठी मोठा त्रास सहन करावा लागतो.

माजी खासदार तथा विद्यमान आमदार कृपाल तुमाने यांनी या बाबत अनेकदा रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांच्या कडे पाठ पुरवठा केला. पण मात्र त्यांच्या पाठपुरवठ्याला यश आले नाही. केंद्रात , राज्यात नव्हे तर नगरपरिषद मध्ये सत्तेत असलेल्या सत्ता धाऱ्यांना या बाबत काही घेणं देण नाही .

कचिकुडा एक्सप्रेस चा थांबा नसल्याने नागरिकात मोठा रोष आहे. याचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल असे चित्र तयार होत आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर नरखेड – काटोल येथे थांबे दिले तर मोवाड येथे का नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मोवाड सह खैरगाव , देवग्राम , मदना , जलालखेडा , भरसिंगी सह अनेक गावातील नागरिकांना अर्ध्या रात्री उठून पहाटे ४.३० वाजता नरखेड जावं लागते त्यामुळे नागरिकात मोठा रोष आहे. जर मोवाड थांबा दिला तर नागरिकांना दिलासा मिळेल. व पायपिटा करून न जाता पहाटे ५.१० ला कचिकुडा मोवाड वरून सुटेल. यावर राजकीय पुढारी लक्ष देतील का असा प्रश्न निर्माण होत आहे.

मोवाड ये शहर मध्यप्रदेश सीमेलगत असून अमरावती जिल्ह्याची सीमा लागून आहे. मोवाड रेल्वे स्थानक ला जवळपास २५ – ३० गावे लागून आहे. दररोज शेकडो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. परंतु लाम पाल्याच्या गाड्याचे थांबे बंद झाल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहे.

निवडणुकीत आश्वासनाची खरात

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्ता धारी पक्षाकडून आश्वासनाची खरात देण्यात आली. तेच लॉलीपॉप पुन्हा मोवाड नगरपरिषद च्या निवडणुकीत देण्यात आले. पण मात्र निवडणूक संपली सत्ता मिळाली नि मात्र जनतेचे प्रश्न जश्याच तसे रहाले. खोट बोला पिन राहठून बोला असा काम आता केंद्र राज्य नी नगरपरिषद मध्ये असलेल्या सत्ता धारी भाजप पक्षा कडून सुरू आहे. पिन मात्र जनतेचे प्रश्न मात्र तसेच आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.