Home Latest News रनाळा शिवारात आऊटर रिंग रोड ओलांडताना मजूर महिलेला अज्ञात वाहनांची धडक महिलेच्या...

रनाळा शिवारात आऊटर रिंग रोड ओलांडताना मजूर महिलेला अज्ञात वाहनांची धडक महिलेच्या शरीराचे दोन तुकडे      

0
58

 

कामठी, ता.१४ : नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील लिहीगाव_कळमेश्वर आऊटर रिंग रोडवर रणाळा शिवारात रनाळा रिंग रोड ओलांडणाऱ्या महिला कामगाराला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने महिलेच्या सरासरी शरीराचे दोन तुकडे झाले होऊन महिला कामगार जागीच ठार झाल्याची घटना सकाळी अकरा वाजताचे सुमारास घडली असून उमा घनश्याम शर्मा (५५) रा. डहाके ले आऊट गोधणी रोड नागपूर असे आहे.
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक महिला कामगार उमा घनश्याम शर्मा वय 55 वर्ष राहणार डहाके ले आऊट गोधणी रोड नागपूर ही ऑरेंज सिटी बिल्डर भीलगाव शिवारातील चैनलाल पटले कंत्राटदाराकडे कामाला जाण्यासाठी सहकारी मिस्त्री सुनील राम बरंगट याचे सोबत गोधणी येथून मोटरसायकल क्रमांक एमएच ४० एबी ७४२३ ने मागे बसून निघाली असता कळमेश्वर- लिहीगाव आऊटर रिंग रोडने ऑरेंज सिटी भिलगाव येथे जात असताना रनाळा शिवारात मोटार सायकल वरून उतरून रिंग रोड ओलांडत असताना लिहीगावावरून–कळमेश्वर कडे जात असलेल्या अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने उमा घनश्याम शर्मा यांना जबर धडक दिल्याने त्यांच्या शरीराचे दोन तुकडे होऊन शरीराच्या एक भाग २०० मीटर वर जाऊन रिंग रोडवर पडला. अज्ञात वाहन चालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती कामठी येथील वाहतूक पोलीस निरीक्षक सुनंदा देशमुख व नवीन कामठी पोलीस स्टेशनला मिळतात पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव,पोलीस कर्मचारी महेंद्र मेश्राम  सहकार्यासह घटनास्थळी जाऊन विखुरलेल्या शरीराचे दोन तुकडे गोळा करून पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून अज्ञात वाहनचालका विरोधात नवीन कामठी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून  नवीन कामठी पुढील तपास करीत आहेत