spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्लॉट धारकांच्या समस्या व अडचणीचा तारणहार कोण ? – रमेश पिसे

नागपूर :- हिंगणा तालुक्यातील बूटीबोरी येथील हिलटॉप ले- आउटमधील प्लॉटधारकांच्या विविध समस्या व अडचणी सोडविण्यासाठी हिलटॉप ले- आउट बूटीबोरी प्लॉट धारकांची कृती समितीच्या वतीने पत्रपरिषदेत समितीचे समन्वयक प्रा.डॉ. रमेश पिसे यांनी प्लॉटधारकांच्या प्रश्नांकडे प्रशासन व संबंधित संस्थेचे लक्ष वेधले. कृती समितीच्या म्हणण्यानुसार, फिर्दोस को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या माध्यमातून १९९३ पासून हिलटॉप ले- आउटमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॉट विक्री करण्यात आली. मात्र, अनेक वर्षे उलटूनही NA/TP प्रक्रिया पूर्ण झालेली नसून प्लॉटधारकांना ७/१२ उतारे, विक्रीखत व ताबापत्र यांसह आवश्यक कागदपत्रांच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्लॉटधारक आर्थिक व कायदेशीर अडचणीत सापडल्याचा आरोप समितीने केला. मार्च २०२५ पासून कृती समिती स्थापन करून प्लॉटधारकांच्या प्रश्नांसाठी बैठका व संबंधित पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा करण्यात आल्याचे पत्र परिषदेत समितीने सांगितले. बूटीबोरी नगर पंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर ले-आउट विकासाबाबत प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाल्याचेही समितीने स्पष्ट केले. नवीन मोजणी व आखणी, प्लॉटधारकांना ७/१२ मिळवून देण्यासाठी सहकार्य, NA/TP प्रक्रिया पूर्ण करणे, बदललेल्या प्लॉटधारकांना न्याय देणे तसेच प्लॉटधारकांच्या संमती शिवाय भविष्यात व्यवहार न करणे, अशा विविध मागण्या समितीने सोसायटीकडे केल्या आहेत. तसेच ग्रुप A, B, C, D, E व स्वतंत्र ले-आउटची नियमानुसार मोजणी करून नकाशे व फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे. आगामी काळात ले- आउटमधील मोजणी व आखणीचे काम करण्याचे नियोजन असून प्रत्येक प्लॉट मागे १,६०० रुपये जमा करण्याचे आवाहन प्लॉटधारकांना करण्यात आले आहे. प्रशासन, शासन व महसूल विभागाकडे प्रश्न मांडताना कृती समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचेही यावेळी सांगण्यात आले. पत्रपरिषदेत यावेळी उपस्थित प्रा. डॉ.रमेश पिसे, उमेश रुषिया, किशोर वाशिमकर, अर्पित खंडेलवाल, मधुकर लोखंडे, संजय इनकाने आदी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.