spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

किस्सा मोबाईल का ! भल्या माणसाला मोबाईल रस्त्यावर सापडला म्हणूनच भेटला रें बाबा ! गजानन महाराजांची कृपाच मणा – PSI उपाध्याय

– अजनी पोलीसांची कामगिरी जंणू महाराजांची कृपा!

मी देवराव प्रधान पत्रकार भवन येथून शुक्रवारच्या रात्री साडेआठ वाजता. घरी जाण्यासाठी निघालो जातेवेळेस, अजनीत पोहोचलो. तिथेच मला एनडीटीव्हीचे मराठी पत्रकार प्रवीण मुधोळकर यांचा फोन आला की कुठे आहे ? त्यांना सांगितलं मी आता सध्या अजनी मध्ये गाडीवर आहे. त्यांचा फोन मी रिसिव्ह केला आणि मोबाईल लेप्टसाईटच्या खिशात जॉकेट मध्ये टाकला. अजनी फुल क्रॉस केल्यानंतर अजनीच्या पुलावरून जातेवेळेस वंजारी नगरच्या पाण्याच्या टाकीच्या जवळपास असं मला जाणवलं की, काहीतरी पडलं पण मी थांबलो नाही मी पुढे निघून गेलो. कारण मला लवकर घरी जायचं होतं. माझ्या मुलीला भूक लागली तिला पार्सल घेऊन जायचं होतं. म्हणून मी मुलीला फोन करण्यासाठी फोन बघितला तर माझ्या खिशात मोबाईल नव्हता गाडीतही नव्हता, बॅगमध्येही नव्हता. मला पूर्ण विश्वास होता की, माझा फोन पडला ? म्हणून मी लगेच.. गजानन महाराजाला आराधन केली की, देवा माझा फोन मला भेटू दे ! त्वरित मी अयोध्यानगर मधूनच परत वापसी अजनी पुलावर आलो. तिथून लेफ्ट साईडला पहात पहात पोलीस स्टेशन पर्यंत पोहोंचलोच मला असं वाटलं की, मोबाईल हरवला आणि तो मिळणार नाही म्हणून मी पोलीस स्टेशन गाठलं तिथे PSI उपाध्याय  यांना भेटलो त्यांना आपबिती सांगितली की, माझा मोबाईल गाडीवर येतानी पुलावर पडला आणि तो हरविला त्यामुळे माझा फोन ब्लॉक करा त्यांना माझा परिचय दिला. मी पत्रकार आहे आणि मी पत्रकार भवनात कर्मचारी आहे. माझे मित्र पोलीस स्टेशनमध्ये अरुण सातपुते आहे. त्यांच्या संपर्कात मी आहे. तुम्ही माझी मदत करा. त्यांना सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी विचारलं की तुमचा फोन पोलीस स्टेशन मध्ये जमा केलेला आहे. कोणतरी भला माणूस आला आणि त्यांनी जमा केला. माझं पूर्ण ऐकल्यानंतर त्यांनी मला फोन परत केला. परंतु ज्या वेळेस फोन पडला त्याच वेळेस माझ्या मुलीचा त्या फोनवर फोन आला की बाबा माझ्यासाठी पार्सल आणा मला भूक लागली. हे ऐकून त्या अनोळखी व्यक्तीने फोन उचलला आणि कानावर ऐकू आले बाबा तुम्ही पत्रकार भवनात आहेत का ? तर तिला दुसऱ्या व्यक्ती चा आवाज आला तर तुम्ही कोण आहेत ? यह फोन मुझे मिला है । अजनी पुल के ऊपर से मै उमेश ठाकूर बोल रहा हु । तर माझ्या मुलीने विचारपूस केली त्यांची माहिती घेतली ते चंद्रमणी नगर येथे राहतो असे म्हणाले आणि त्यांना सांगितलं की आपण पोलीस स्टेशनमध्ये फोन जमा करा. परत त्याच फोनवर NDTV चे मराठी पत्रकार प्रवीण मुधोळकर यांचा फोन आला तर त्याच व्यक्तीने उचलला आप कोण बोल रहे है। मुझे फोन मिला है। त्यांनी पण सांगितले की पोलीस स्टेशनला फोन जमा करा. त्यानंतर माझे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांनी फोन केला तर तो त्यांनी रिसिव्ह केला त्या व्यक्तीने आणि सांगितले की माझे मित्र मानेवाडा चौकात येतील त्यांना तुम्ही तिथं देऊन द्या. मी त्यांना कॉल करून सांगतो. परंतु त्यांना काय झालं म्हणून असं माहित नव्हतं ! परत माझ्या मुलीने फोन केला की तुम्ही पोलीस स्टेशनमध्येच मोबाईल जमा करा.

मी शोध घेतला परंतु मला फोन मिळालाच नाही म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच फोन घेतल्यानंतर लगेच घरून फोन आला की, तुम्ही कुठे आहे. त्यांना सांगितलं की मी विश्वकर्मानगर मध्ये आहे. तुम्ही तिथेच थांबा आम्ही पोलीस स्टेशनला येतो आहे. मी तसंच सांगितलं की, फोन मला मिळाला. मी पोलीस स्टेशन मधून निघालो आहे. तुम्ही घरी वापस या. अशा प्रकारे माझ्यासोबत आज किस्सा झालेला आहे. माझ्या कुटुंबाला असे वाटले की बाबाचा फोन या व्यक्तीला सापडला परंतु माझे बाबा कुठे गेले ? या टेन्शनमध्ये होते. परंतु त्या भल्या व्यक्तीने फोन जमा केल्यानंतर माझ्या घरच्यांना अडचणीत टाकलं आणि ते घाबारले ! असं होऊ नये म्हणून सांगतोय की गाडीवर फोन उचलू नका ! बरोबर फोन जपून ठेवा ! जेणेकरून आपला मोबाईल नंबरचा वापर कोणीही करू नये यासाठी मी आपणास सांगतो की या भल्या माणसाने जी माझी मदत केली त्याचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो आणि मला तेथील पोलिसांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद मानतो.

मोबाईल अशी वस्तू आहे जेणेकरून माणूस त्याच्या बिना अधुरा आहे. सर्व काही मोबाईलच आहे. आज जर मोबाईल माझ्या हातातून निघून गेला असता तर मला किती त्रास झाला असता हे मलाच माहीत…….

सन 2025 वर्ष हे मला सुखाचे आनंदाचे गेले सरते शेवटी अशा प्रकारे माझ्या सोबत किस्सा घडला ! माऊलींची कृपा होती म्हणूनच माझा फोन मला परत मिळाला……

जाने वाले साल को सलाम

आने वाले को साल को सलाम

आप सभी को 2026 साल कि शुभकामनाए- हॅपी न्यू इयर- हॅपी न्यू इयर- हॅपी न्यू इयर


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.