Home Latest News बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडकडून नवऱ्याला कारमध्ये कोंबून किडनॅप करण्याचा थरारक प्रयत्न, पण कारमधून...

बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडकडून नवऱ्याला कारमध्ये कोंबून किडनॅप करण्याचा थरारक प्रयत्न, पण कारमधून उडी मारली अन्…

0

<p><strong>नाशिक १८ &colon;<&sol;strong> नाशिक शहरातील सातपूर &lpar;Satpur&rpar; परिसरात भरदिवसा एका तरुणाचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून&comma; तरुणाने प्रसंगावधान राखून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढून थेट पोलिस ठाणे गाठल्याने अनर्थ टळला&period; या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात &lpar;Satpur Police Station&rpar; गुन्हा दाखल करण्यात आला असून&comma; मोबाईल फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>पीडित तरुण तेजस ज्ञानदेव घाडगे &lpar;वय 24&comma; रा&period; त्र्यंबकराज नगर&comma; ध्रुवनगर&comma; नाशिक&rpar; याने दिलेल्या फिर्यादीनुसार&comma; तो ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि काही दिवसांपूर्वीच त्याचे लग्न मधुमती नामक तरुणीशी झाले आहे&period; मात्र&comma; मधुमतीचे विवाहाच्या आधी गिरीश शिंगोटे या तरुणाशी प्रेमसंबंध होते&comma; आणि लग्नानंतर तो सातत्याने तेजस याला धमक्या देत होता&period;<&sol;p>&NewLine;<p>6 ते 7 जणांनी तरुणाला गाडीत कोंबले<br &sol;>&NewLine;दि&period; 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता घडली&period; तेजस आपल्या मित्रास भेटण्यासाठी त्र्यंबक रोडवरील हिंद सोसायटी समोर असलेल्या चहा टपरीवर गेला असता&comma; तेथे गिरीश शिंगोटेचा मित्र शैलेश ऊर्फ बंटी&comma; अक्षय पवार व त्यांचे 4-5 साथीदार सफेद रंगाची स्विफ्ट डिजायर &lpar;MH 06 AS 5517&rpar; गाडी घेऊन आले&period; त्यांनी तेजसला टपरीबाहेर ओढून गाडीमध्ये जबरदस्तीने बसवले व त्याला मारहाण करत अपहरण केले&period;<&sol;p>&NewLine;<p>जीव मुठीत धरून तरुणाने गाठले पोलीस ठाणे<br &sol;>&NewLine;गाडी सातपूर कॉलनीकडे नेत असताना&comma; तेजसला मारहाण करत त्याचा मोबाईलही हिसकावण्यात आला&period; मोबाईलचा लॉक उघडून घेण्यात आला&period; मात्र&comma; प्रसंगावधान राखत तेजसने शिव हॉस्पिटलजवळून गाडीतून उडी घेतली आणि तातडीने एका रिक्षातून पपाया नर्सरी येथील ट्राफिक पोलिस चौकी गाठली&period; पोलिसांना सर्व प्रकार सांगितल्यानंतर अपहरणकर्ते तेथून फरार झाले&period;<&sol;p>&NewLine;<p>सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल<br &sol;>&NewLine;सातपूर पोलिसांनी गिरीश शिंगोटे&comma; शैलेश कुवर उर्फ बंटी&comma; अक्षय पवार व इतर अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरण&comma; मारहाण आणि धमकी यासंबंधी कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे&period; ही संपूर्ण घटना परिसरातील नागरिकांनी मोबाईलवर शूट केली असून&comma; त्याचे फुटेज पोलिसांकडे सापडले आहे&period; या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; abpमाझा<&sol;p>&NewLine;

Exit mobile version