spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हडपसर परिसरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी गती देणार – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर :- हडपसर परिसरातील नागरी समस्यांच्या निराकरणासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात असून, विविध प्रकल्पांची कामे गतीमान करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य उमा खापरे यांनी हडपसर परिसरातील नागरी समस्यांविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.

राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, स्वागत हॉटेल जवळील मार्वल ब्यूटी ते साधना बँक जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास पावसाळ्यात विलंब झाला होता. मात्र, सध्या हे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून रस्त्याखालील पाण्याच्या पाईपलाईनचे आवश्यकतेनुसार काम पूर्ण झाले आहे. चढावाच्या भागाला योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठीचा बूस्टर पंप बसविण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

साडेसतरानळी येथील अॅमनोरा मॉल ते पाईपलाईन या १८ मीटर आर.पी. रस्त्यात अडथळा निर्माण करणारी झाडे छाटणे किंवा स्थलांतरित करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली असून, परवानगी मिळाल्यानंतर झाडे छाटणे, पुनर्रोपण व वृक्षारोपणाची कार्यवाही पथ विभागामार्फत करण्यात येणार आहे.

साडेसतरानळी गावाजवळील यश हॉस्पिटल परिसरात पावसाचे पाणी साचणे व रस्ता खराब होण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी डांबरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच लेबरशेड मजूरवस्तीची जागा महापालिकेच्या ताब्यात नसल्याने संबंधित मालकाशी ती ताब्यात घेण्याबाबत चर्चा सुरू असून, जागा ताब्यात आल्यावर रस्ता विकासाची प्रक्रिया गतीमान केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.