spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील टीडीआर देण्याबाबतच्या प्रकरणी तक्रार आल्यास चौकशी करू – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत टीडीआर देण्याबाबतच्या प्रक्रियेतील अनियमिततेबाबत विधिमंडळ सदस्यांकडून विशिष्ट प्रकरणी तक्रार व माहिती प्राप्त झाल्यास या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगररचना विभागातील टीडीआर प्रकरणी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना सांगितले, टीडीआर देण्याचे अधिकार हे आयुक्त किंवा संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडेच असतात. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आकृतीबंधामध्ये १२ कार्यकारी अभियंता (स्थापत्य) व २४ उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) ही पदे मंजूर आहेत. तसेच त्यांना बांधकाम मंजुरी अथवा टीडीआर मंजुरीचे कोणतेही अधिकार महापालिकेतर्फे प्रदान केले नसल्याने त्यांच्याकडून ११० बांधकामांना मंजुरी देण्यात आली नसल्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी उत्तरात सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.