पांढरकवडा :- युवा राष्ट्रसंत भैय्युजी महाराज बी. एड.(महिला) कॉलेज येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थीनी हर्षा शेंडे यांनी उपस्थिती दर्शविली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अशोक राऊत व द्वितीय वर्षीय प्रशिक्षणार्थीनी वैशाली सोमटकर यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाची सुरूवात ही सरस्वती माता यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. द्वितीय वर्षीय प्रशिक्षणार्थीनी समृद्धी डंभारे यांनी स्वागत गीत सादर केलं. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थीनी प्रतिभा चौधरी व अश्विनी भोयर यांनी कविता सादर केली तसेच अक्षता गराड यांनी कुसुमाग्रस यांची कविता सादर केली.
त्यानंतर प्रमुख पाहुण्या वैशाली सोमटकर यांनी कविता सादर केली. मराठी भाषेची संवर्धन करणे अगत्याचे आहे असे प्रा. डॉ. अशोक राऊत यांनी मराठी भाषेचं महत्त्व पटवून देत काही मराठी मधील कविता सादर केल्या व मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा हर्ष शेंडे यांनी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या विषयी मार्गदर्शन केले व एक मराठी शिक्षिका कशी असावी या बदल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला बी. एड. प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थीनी उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे संचालक श्याम अरके, डॉ. अंशु साहू, डॉ. सुजया बिजवे , डॉ. सारिका निकम, प्रा. पंकज आगलावे, प्रा. शेखर खिस्ती सर, प्रा. जपिंदरकौर कानसे, प्रा जान्हवी भोयर, नलिनी करपते व समस्त शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षीय प्रशिक्षणार्थीनी प्रांजली झांबरे यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन समृद्धी डंभारे यांनी केले व अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले.




