शिवसेना हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे. – राज्यमंत्री आशिष जयस्वाल
रामटेक २६ – पक्ष संघटन मजबूत करणारा नेताच कार्यकर्त्यांना आवडत असतो. याच स्वरुपाचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल करीत आहेत. हिच त्यांची कार्यशैली पाहता त्यांच्या नेतृत्वाखाली दि २४ ऑगस्ट २०२५ रोजी रामटेक तालुक्यातील देवलापार रामटेकडी येथिल महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात सायरा शेंडे, सेनुलता कोडवते, रायवती खंडाते, आरती वरठी, ललिता इनवाते, दिपा वरठी, निशा वरठी, पूजा वरठी, रोशनी तुरपुरे, रेशमा भलावी, प्रियंका वरठी, शिला इनवाते, अनिता इनवाते, किरण वरठी सह अनेक महिलांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते भगवे दुपट्टे घालून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले ” शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्न करीत आहे. शिवसेना हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे. आता मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य माणसाला आपलं भविष्य आता शिवसेनेमध्ये दिसू लागलेले आहे. सर्वसामान्य माणसाला देखिल शिवसेनेमध्ये संधी मिळते.
माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला शिवसेने पाचदा आमदार आणि राज्यमंत्री देखील बनविले आहे. शिवसेनेच्या बळकटीकरणसाठी मी सदैव काम करीत आहे. शिवसेनेत येणाऱ्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्यामागे ताकदीने उभा आहे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे उभे आहेत.”
यावेळी शिवसेनेचे माजी सभापती पंचायत समिती रामटेक संजय नेवारे, युवासेना रामटेक तालुका संघटक आकाश पंधरे, शिवसेना देवलापार उपविभाग प्रमुख रिजवान पठाण, रोमित गुप्ता यावेळी उपस्थित होते.




