spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्त्रियांनी जीवनातील अडचणींचा धैर्याने सामना करावा – नगराध्यक्ष अजय अग्रवाल 

कामठी :- व्यक्तिक आणि व्यवसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दररोज कठोर परिश्रम करणाऱ्या महिलांचा कौतुक करण्याचा हा जागतिक महिला दिनाचा सोहळा आहे.बऱ्याच लोकांसाठी महिलांची भूमिका केवळ घरातील कामे करण्यासाठीच मर्यादित असतात मात्र यामध्ये बदल होणे आवश्यक आहे कारण स्त्रिया ह्या आजच्या स्पर्धात्मक आधुनिक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत.आणि सर्व क्षेत्रात यश पादांक्रित करीत आहेत.तेव्हा जीवनातील सर्व अडचणीचा स्त्रियांनी धैर्याने सामना करायला हवे असे मौलिक प्रतिपादन नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी कामठी येथील दाल ओली क्र 1 येथे भाजपा महिला आघाडी द्वारा आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात व्यक्त केले.याप्रसंगी उपस्थित समस्त महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान समाज व राष्ट्र निर्माण मध्ये महिलांच्या अमुल्य योगदान चा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा महिला आघाड़ी अध्यक्षा प्रीती मानमोडे, महिला आघाड़ी अध्यक्षा नंदा बारई, नगर परिषद उपाध्यक्ष सभा प्रवीण खान, नगर सेविका दिव्या कपिल गायधने, नगर सेविका मनीषा नागपूरे, नगर सेविका प्रणाली मेश्राम, गायत्री यादव, प्रभा राउत, रोशनी कानफाड़े, पल्लवी डोंगरे, वैशाली मानवटकर, रोशनी कानफाड़े, सरिता रंगारी, अश्विनी संतापे, प्राची मेंढे, आरती मंगलानी, गीता मंथनवार, सरोज तालेवार, कविता चौधरी, लीला गायगोले, लता शर्मा, संगीता मेहर, रंजन वाजपेयी सहित अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Popular Articles