गडचिरोली :- महिला व बाल विकास विभाग महिलांचा समस्यांचे निराकरण व्हावे व त्यांच्या समस्यांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येत आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे या हेतुने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवारला महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. महिलांचा कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तीक समस्या, गा-हाणी, अडीअडचणी ऐकुन त्यांचे अर्ज स्वीकारण्यात येईल. परंतु न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक व आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसलेले किंवा आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकृत करण्यात येणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी तसेच अर्ज हे वैयक्तीक स्वरुपाचे असावेत अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली बॅरेक क्रमांक 1, खोली क्रमांक 26,27 कॉम्पलेक्स, गडचिरोली या कार्यालयात नि: शुल्क प्राप्त होईल. अर्ज 15 दिवसाआधी दोन प्रतीत सादर करावे. तरी दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी सोमवारी सकाळी 11. 00 वाजता जिल्हा महिला लोकशाही दिनाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी सर्व पिडीत/समस्याग्रस्त महिलांनी आपले अर्ज सदर कार्यालयात सादर करावे, याबाबत सर्व महिलांनी नोंद घ्यावी. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.








