spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अरोली येथे आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला ग्रामसभा व सांस्कृतिक कार्यक्रम

– होम मिनिस्टर फेम रोशन हुकरे निभावणार निवेदकाची भूमिका

– गावातील सर्व महिलांनी उपस्थित राहावे – सरपंचा रोशनी प्रशांत भुरे 

किशोर साहू, मौदा :- आज रविवार (ता.८ मार्च )ला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अरोली ग्रामपंचायत तर्फे संतकृपा मंगल कार्यालयात सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत महिला ग्रामसभा तथा महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजनात्मक करण्यासाठी निवेदक म्हणून होम मिनिस्टर फेम रोशन हुकरे उपस्थित राहणार आहेत.

महिला ग्रामसभेत महिलांच्या उत्थानासाठी व त्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करून विकासात्मक ठराव घेण्यात येणार आहे, तरी गावातील महिलांनी महिला ग्रामसभा व सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान सोशल मीडियावर तशा प्रकारच्या व्हिडिओ व्हायरल करून अरोली ग्रा पं च्या सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.