spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर विभागातील कोषागार कार्यालयांची कार्यशाळा संपन्न

नागपूर :- महालेखापाल कार्यालयाशी निगडीत कोषागार कार्यालयांच्या लेख्यासंबंधित विविध बाबी समजून घेणे व कामकाजामध्ये सुयोग्य समन्वय साधन्याच्या उद्देशाने सहसंचालक लेखा व कोषागारे कार्यालयात 14 मे 2026 रोजी नागपूर विभागातील कोषागार कार्यालयांसाठी कार्यशाळा संपन्न झाली.

सहसंचालक लेखा व कोषागारे नागपूर आणि महालेखापाल कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रधान महालेखापाल सुहासिनी गोतमारे यांनी मार्गदर्शन केले. वरिष्ठ उपमहालेखापाल जितेंद्र गुप्ता, लेखा व कोषागारे विभागाच्या सहसंचालक ज्योती भोंडे, वरिष्ठ कोषागार अधिकारी मोनाली भोयर, सहायक संचालक शैलेश कोठे (प्र) आदी उपस्थित होते.

नागपूर विभागाने मागील आर्थिक वर्षात केलेल्या उत्तम कामगिरीचा उल्लेख करत सुहासिनी गोतमारे यांनी सांगितले, नागपूर विभागाने 92.81 टक्के प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रांचा निपटारा केला व 100 टक्के ताळमेळ पूर्ण केला. यावेळी निवृत्तीधारकांना ‘ऑनलाईन ओजीआरएस’ व ‘पेंशन समाधान प्रणाली’चा जास्तीत-जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. कोषागारासंबंधीत लेखांकन पद्धतीबाबत येणाऱ्या अडचणी व उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

तत्पूर्वी, सहसंचालक लेखा व कोषागारे ज्योती भोंडे यांनी प्रधान महालेखापाल सुहासिनी गोतमारे यांचे स्वागत केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन सहायक संचालक शैलेश कोठे (प्र) यांनी केले. प्रधान महालेखाकार कार्यालयातील वरिष्ठ लेखाधिकारी व सहायक लेखाधिकारी आणि नागपूर विभागातील सर्व कोषागार अधिकारी या कार्यशाळेस उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.