spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी घेतली मनपाच्या विविध विकास प्रकल्पांचा माहिती

 नागपूर २० : ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ या संस्थेच्या माध्यमातून जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी बुधवारी(ता.२०) नागपूर महानगरपालिकाद्वारे शहरात राबविल्या जाणाऱ्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. या संदर्भात प्रतिनिधी मंडळाने नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त  अजय चारठाणकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त  मिलिंद मेश्राम आणि अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी व  देवेंद्र इंदूरकर उपस्थित होते.

जागतिक बँकेच्या प्रतिनिधीमंडळात आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधा वित्त विशेषज्ञ  विल्यम स्ट्रीटर, व्हाईटमन कन्सल्टिंग एलएलसीचे  ॲडम जे. व्हाईटमन आणि हवामान बदल विश्लेषक  पंखुरी सेखॉन यांचा समावेश होता.

 मनपा आयुक्त  तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छतासह इतर महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती जागतिक बँकेच्या प्रतिनिधींना दिली. या चर्चेमुळे नागपूरच्या विकास प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्यास मदत मिळणार आहे.

Popular Articles