spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाजपा प्रभाग 04 व मनपा UPHC विजय नगर भरतवाडा च्या संयुक्त विद्यमानाने योग दिवस साजरा करण्यात आला

– योग दिनी आरोग्यदायी जीवनाचा संकल्प! योग करूया, निरोगी शरीर, शांत मन आणि सशक्त समाज घडवूया

नागपूर :- पहाटेचे प्रसन्न वातावरण, योगदिनाचा उत्साह आणि सामूहिक योगाचा उत्सव साजरा करण्यास एकत्र आलेल्या प्रभाग 04 मधील नागरिक आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी नि आज गुलमोहर नगर उद्यान इथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ आम्ही उत्साहात साजरा केला.

यानिमित्ताने योगाचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष आचरणात आणला. योगासने, प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून हा दिवस सार्थकी लावणारे आयोजक, योगशिक्षक व नागरिकांचे मनःपूर्वक आभार.

आरोग्य सभापती मनिषा अतकरे यांनी आपल्या संबोधनात सांगितलं की ‘आरोग्यसंपन्न वृद्धत्वासाठी योग’ ही यंदाच्या योगदिनाची थीम आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाने आज वैश्विक रूप धारण केले असून मानवतेसाठी समग्र कल्याणाचे प्रतीक बनला आहे.

महर्षी पतंजली आणि प्राचीन ऋषीमुनींनी जगाला दिलेली अनमोल भेट म्हणजे अष्टांगयोग. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी भारतीय संस्कृतीची अपूर्व देणगी आहे. नियमित योगाभ्यास करून निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचा संकल्प यानिमित्ताने आम्ही आपण सर्व करूया.

प्रभाग 04 मधील गुलमोहर नगर उद्यान, नेताजी नगर उद्यान, शिक्षक कॉलनी हनुमान मंदिर परिसरात नियमित योग वर्ग शुरु असतात यावेळी योग गुरु  ADV नरेटे, मनपा आरोग्य समिती सभापती मनिषा अतकरे, नगरसेवक रामदास साहू,uphc विजय नगर येतील डॉ बिरंजन, भाजपा मीडिया प्रमुख पवन तिवारी भाजपा प्रभाग अध्यक्ष शैलेश शाहू, राजकुमार काटेकर, महिला आघाडी अध्यक्ष कल्पना तिवारी, शोभा सिन्हा,डॉ यारेंद्र राहणंगदाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली.मंच संचालन व आभार प्रदर्शन राजकुमार काटेकर यांनी केले.

Popular Articles