नागपूर :- रामटेक तालुक्यातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याची लेक योगिता दयाराम बरडे यांना सामाजिक, शैक्षणिक व महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल तसेच नव्या पिढीतील मुलींसाठी प्रेरणास्थान ठरल्याबद्दल प्रतिष्ठित “राजमाता जिजाऊ पुरस्कार 2026” ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार सुधाकर कोहळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच आविष्कार फाउंडेशनचे मान्यवर डॉ. कापटा, पूर्णिमा कापटा, रेनू सिधू कौर व माया गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार समाजसेवा, महिला सशक्तीकरण व विविध सामाजिक उपक्रमांमधील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. योगिता बरडे यांनी आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना योगिता दयाराम बरडे यांनी सांगितले की, हा सन्मान त्यांना भविष्यात अधिक जोमाने समाजकार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.
Home Latest News रामटेक तालुक्यातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याची लेक योगिता दयाराम बरडे यांना “राजमाता...



