टीएमएस अकॅडमी प्रस्तुत, तेजश्री उपाध्याय यांच्या नेतृत्वात सीजन 8 चा कराओके कार्यक्रम मोठ्या उत्साहात

0
50

– सीझन 8 कराओके सिंगिंग स्पर्धा व पुरस्कार सोहळ्याचे यशस्वी आयोजन संपन्न

नागपूर :- टी एम एस अकॅडमी अँड ब्युटी प्लेस तर्फे सीझन 8 कराओके सिंगिंग स्पर्धा व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सेलिब्रिटी प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून स्वस्तिका ठाकूर झी टीव्ही च्या स्वर्ण वार भारत विजेत्या व रेंसिंग स्टार फायनलिस्ट यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या स्पर्धेत स्वरूपा धमकंकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर स्वरा मातुरकर यांनी द्वितीय आणि सचिन शिवपुरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. सांत्वन पुरस्कार अक्षय देशमुख, स्वप्नील बांकर आणि पूनम अनवर यांना देण्यात आले. हा कार्यक्रम तेजश्री उपाध्याय यांनी उत्कृष्टरीत्या आयोजित केला असून त्यांनी सर्व सहभागी असलेले व मान्यवरांचे आभार मानले.

यावेळी विशेष अतिथी म्हणून डॉ.अनिल धाकटे, डॉ. करुणा बोगावर, डॉ. माधुरी शिंदे आणि डॉ. रश्मी तिरपुडे उपस्थित होत्या.