spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कोर्ट कचेरीच्या फेऱ्यातून मिळणार सुटका;13 डिसेंबर ला लोकअदालत

कामठी :- वाद मिटविण्यासाठी आणि कोर्ट कचेरीच्या फेऱ्यातून कायमची सुटका करून घेण्यासाठी पक्षकारांना एक सुवर्णसंधी चालून आली आहे.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार 13 डिसेंबर 2025 रोजी कामठी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयमध्ये’ राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालतीच्या निवाड्या विरुद्ध अपील नाही त्यामुळे एकाच निर्णयात प्रकरणाचा कायमचा निकाल लागतो.साक्षी पुरावा,उलटतपासणी आणि दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात ज्यामुळे निकाल झटपट लागतो.दोन्ही बाजूच्या संमतीने निर्णय होत असल्याने कुणाचीही हार किंवा जित होत नाही त्यामुळे कटुता न वाढता नातेसंबंध जपले जातात.

तेव्हा पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन आपले वाद समोपचाराने मिटवावेत असे आवाहन कामठी तालुका विधी सेवा समिती च्या वतीने करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.