spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

करडी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू; मृताची ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

हंसराज,करडी :- करडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा ढिवरवाडा गावाच्या गेटजवळ एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडला असून, मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.

१८ मे २०२६ रोजी सकाळी ढिवरवाडा गावाच्या गेटजवळ रस्त्याच्या कडेला एका इसमाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासानुसार, १७ ते १८ मे च्या दरम्यान रात्रीच्या सुमारास एखाद्या अज्ञात वाहन चालकाने या इसमाला धडक दिली असावी. ही धडक इतकी भीषण होती की, तरुणाच्या डोक्याला, डाव्या पायाला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी करडी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १४६ /२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १३४ (ए) (बी) आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढिवरवाडा, डोंगरदेव आणि परिसरातील गावांमध्ये चौकशी करूनही अद्याप मृताची ओळख पटू शकलेली नाही.

मृतकाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे:

– वय: अंदाजे ३० ते ३५ वर्षे

– उंची: १६६ से.मी. (५ फूट ५ इंच)

– रंग व ठेवण: सावळा रंग, सडपातळ शरीरयष्टी, दाढी-मिशी आणि डोक्याचे केस वाढलेले.

– अंगावरील कपडे: गडद निळ्या रंगाचा टी-शर्ट (ज्याच्या डाव्या बाहीवर पांढऱ्या

रंगाच्या पट्टीत ‘JUSTDO’ असे लिहिले आहे) आणि निळ्या रंगाचा लोअर घातलेला.

वरील वर्णनाचा कोणताही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा या मृतकाबाबत कोणाकडेही काही माहिती असल्यास, नागरिकांनी तातडीने पोलीस स्टेशन करडी यांच्या ०१७८३-२९९२७७ या क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करडी पोलिसांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.