spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नांदगाव शेत घरातुन ०९ क्किटल कापुस चोरी

कन्हान :- नांदगाव येथील शेतकरी राजेंद्र रच्छोरे यांचे शेतातील घरात कापुस काढुन गोळा करून ठेवलेल्या घराच्या दाराचे कुलुप तोडुन अज्ञात चोरा १८ बो-या ९ क्किटल कापुस ६३ हजार रू. चा मुद्देमा ल चोरून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नांदगाव येथील शेतकरी राजेंद्र हिरालाल रच्छोरे वय ३९ वर्ष, शेती करित असुन त्याची १२ एकर शेती असुन वृषभ मेघराज मोदी नागपुर याची १० एकर शेत ठेका बटईने करित आहे. सध्या शेतात कापुस तुर अस ल्याने दहा महिला मजुराच्या हाताने कापुस काढणे सुरू असुन शेतातील घरात ठेवत आहे. गुरूवार (दि. २५) डिसेंबर ला दिवसभर कापुस वेचुन सायंकाळी ६ वाजता शेतात जावुन महिलानी वेचलेला कापुस १८ बोरे व स्वत: चे १२ बोरे कापुस शेतातील घरात ठेवला तसेच खुला कापुस सुध्दा तेथे होता. सर्व कापुस शेता तील घराचा दरवाजा बंद करून लॉक लावुन ते घरी निघुन गेले.

शुक्रवार (दि.२६) डिसेंबर २०२५ ला सकाळी ९ वाजता शेतातुन मजुर महिलेचा फोन आला की, शेत घरातील दाराचे कुलूप तुटलेले असुन कापुस अस्ता व्यस्त पडलेला असल्यांचे सांगितल्याने राजेंद्र रच्छोरे यांनी शेतात जावुन पाहीले असता शेतातील घरातील दाराचे कुलूप तुटलेले दिसुन आत ठेवलेल्या कापसाचे १८ बोरे दिसुन आले नाही अंदाजे एका बो-यात ५० किलो असा एकुण ९०० किलो कापुस प्रत्येकी ७० रू प्रमाणे अदाजे ६३,००० रू. चा कापुस हा दिसुन न आल्याने शेतात इकडे तिकडे शोध घेतला परंतु दिसुन आला नसुन दरवाज्या सामोर एक लोखंडी ब्लेड दिस ल्याने शेतातील घरातुन कोणीतरी अज्ञात चोरानी शेतातील सामान ठेवण्याकरिता बनविलेले घराचे कुलुप तोडुन १८ बोरे कापुस ९०० किलो प्रत्येकी ७० रू. किलो प्रमाणे किमत ६३, ००० रू.चा मुद्देमाल चोरून नेल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी शेतकरी राजेंद्र हीरा लाल रच्छोरे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी अज्ञात चोरा विरूघ्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस निरिक्षक वैजयंती मंडवाधरे यांच्या मार्गदर्शना त कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.

Popular Articles