– १५ मे २०२६ रोजी गोरेवाडा ESR आणि GSR (CA) क्षेत्राचा १० तासांचा शटडाऊन
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेने (NMC) १५ मे २०२६ रोजी सकाळी ०६ :०० ते दुपारी ०४:०० पर्यंत Gorewada ESR & GSR CA १० तासांसाठी शटडाउन नियोजन करण्यात आला आहे. हे शटडाउन नेताजी नगर, गोरेवाडा येथे ४५० मिमी × २०० मिमी व्यासाच्या इनलेट पाईपच्या (I/C work) कामासाठी आवश्यक आहे.
या शटडाऊनमुळे मंगळवारी झोन अंतर्गत येणाऱ्या खालील क्षेत्रांमध्ये पाणीपुरवठा बाधित राहील:
गोरेवाडा वस्ती, विशाखा सोसायटी, निर्मल नगर, दर्शना सोसायटी, नटराज सोसायटी, IQRA स्कूल, महाराणा १ आणि २, शीतला माता मंदिर, जय दुर्गा सोसायटी, क्रेसेंट सोसायटी, नशेमन सोसायटी, टॉवर लाईन, गोरेवाडा बाबू नगर, M.B. टाउन, प्रकाश नगर, राठी ले-आऊट, ग्रीन फील्ड सोसायटी, मानोडा नगर, गायत्री नगर, बाबा बगदडिया, श्री कृष्ण नगर, गीता नगर, आदर्श नगर, फारस बंधू नगर जुनी वस्ती, झिंगाबाई टाकळी, वेलकम सोसायटी, जय दुर्गा सोसायटी, आविष्कार सोसायटी, डोबळे ले-आऊट, राधा कृष्ण नगर, पुरुषोत्तम सुपर मार्केट.
या पाणीपुरवठा शटडाउनदरम्यान नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणी साठा करून ठेवावा व पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा किंवा बिल भरण्याबाबत अधिक माहिती अथवा मदतीसाठी, ग्राहक NMC–OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात, contact@ocwindia.com या पत्त्यावर ईमेल करू शकतात किंवा Play Store अथवा App Store वरून ‘Nagpur Jal Grahak Sewa App’ डाउनलोड करू शकतात.