साळवा :-दिनांक 24 सप्टेंबर ला होमगार्ड पथक कुही तर्फे वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक वनीकरण कार्यालय कुही मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका सावंगी पचखेडी येथुन झाडे आणण्यात आले.
जिल्हा समादेशक नागपूर तथा अपर पोलिस अधिक्षक अनिल मस्के , केंद्र नायक दिपेश जवादे , प्रशासकीय अधिकारी अनिल यादव तसेचे पोलिस स्टेशन कुही चे पोलीस निरीक्षक काळे, पोलिस उपनिरीक्षक इंगोले, गोपाले, अरुण मेहर यांचे हस्ते व उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले. 

या झाडांमध्ये जांभूळ , करंजी कडुलिंब,शिताफळ, आवळा, जांब,बेहळा, बदाम,बेल,आस्टिलियन बांबू, कॅशिओ बांबू अश्या वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावण्यात आले.
सदर वेडी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले व कुही होमगार्ड पथकातील अधिकारी व होमगार्ड कर्मचारी यांचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज बारसागडे पर्यवेक्षक अधिकारी होमगार्ड पथक कुही, राजू बोरकर, विकास कावळे, नारायण शेंडे, मुकुंदा वाल्दे, वासुदेव मेहर, धनराज पाटील, मंगेश खराबे, देवानंद मेश्राम, विष्णू मांढरे, किरण वैरागडे, वामन चरडे, विलास कांबळे, विलास जंजाळ, सुनील भजनकर , श्रिमती हिरावती नंदुरकर, कुही होमगार्ड पथकातील पुरूष आणि महीला सैनिक उपस्थितीत होते .




