spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गोंदिया च्या महाराणीला भाविकाने चढविला सोन्याचा साडे तीन फूट लांब स्वर्ण हार

– नवसाला पावणारी देवी अशी दुर्गा मातेची ओळख 

गोंदिया :- महाराणी अशी ओळख असलेल्या श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती इंगळे चौक या ठीकाणी विराजित करण्यात येत असलेल्या दुर्गा देवीला गोंदियातील संजय आपटे या भाविकाने साडे तीन फिट लांब असलेला सुवर्णं हार भेट दिला आहे तर या आधी देखील देश विदेशातील भाविकांच्या मनोकामना गोंदियाची महारानी म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या दुर्गा देवीने पूर्ण केल्याने कोट्यावधी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने भाविकांनी देवीला भेट दिली आहेत.

गेल्या 57 वर्षा पासून इंगळे चौकात दुर्गा उत्सव साजरा करण्यात येत असून हि देवी भाविकांच्या मनोकामना पूर्ण करत असल्याने नवसाला पावणारी देवी अशी या दुर्गा मातेची ओळख आहे.

तर या आधी देखील गोंदिया शह, मुबई तसेच अस्ट्रेलिया येथील भाविकाने देखील गोंदियाच्या महाराणीला सोन्याचा हार अपूर्ण केला होता तर ह्या देवीची ख्याती आता गोंदिया भंडारा जिल्यातच नव्हे तर प्रदेशात देखील पोहचल्याने तेथील भाविक देखील गोंदियाच्या माहारणीकडे नवस कबूल करीत नवस पूर्ण होताच देवीला सोन्या, चांदीचे आभूषण अर्पण करतात तर या वर्षी देखील संजय आपटे या भाविकाने दुर्गा देवीला दुसऱ्यांदा सुवर्णं हार देवीला अर्पण केला आहे. तर या नऊ दिवसतात गोंदियाच्या महाराणीच्या दर्शना करिता गोंदिया शह बाहेर जिल्यातील तसेच इतर राज्यातील भाविक लाखोंच्या संख्येने या मंडपात देवी समोर नतमस्तक होत आपली इच्छा बोलून दाखवतात आणी भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने गोंदियाच्या महाराणीची ख्याती आणखी वाढत चालली आहे .


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.