नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे शहराला रेबीजमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन रेबीज’ हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतर्गत मागील २० दिवसांत १०,६५४ हून अधिक भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबवला जात आहे. डब्ल्यूवीपी होप मिशन रेबीज, निर्मिती पीपल अँड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी यांच्या सहकार्याने शहरात सामूहिक श्वान लसीकरण मोहीम सुरू आहे.
शहरातील भटक्या जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भांडेवाडी, गोरेवाडा आणि महाराजबाग येथे प्राणी जन्म नियंत्रण केंद्र तयार करण्यात आले आहेत. गेल्या तीन वर्षांत या तीन केंद्रांवर ५६,९९७ कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये आधुनिक श्वान निवारा केंद्र आणि प्राणी निर्बीजीकरण केंद्र देखील उभारले गेले आहे.अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.
आजारी, अपघातग्रस्त, पिसाळलेली किंवा चावा घेणाऱ्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी प्रत्येक झोनमध्ये विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे शहरात भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यास आणि त्यांना रेबीजपासून सुरक्षित ठेवण्यास मदत होत आहे.
ही मोहीम २८ सप्टेंबरपर्यंत चालणार असून, खालील तारखांनुसार लसीकरणाची आकडेवारी:
* १ सप्टेंबर: २०
* २ सप्टेंबर: ७५
* ३ सप्टेंबर: २५
* ४ सप्टेंबर: ३७
* ५ सप्टेंबर: ५६
* ६ सप्टेंबर: ५८
* ८ सप्टेंबर: ५५
* ९ सप्टेंबर: ६७
* १० सप्टेंबर: ५६६
* ११ सप्टेंबर: १,०७४
* १२ सप्टेंबर: १,१४७
* १३ सप्टेंबर: १,१२१
* १४ सप्टेंबर: ८९६
* १५ सप्टेंबर: १,१७१
* १६ सप्टेंबर: ९२१
* १७ सप्टेंबर: १,०६८
* १८ सप्टेंबर: १,१२९
* १९ सप्टेंबर: १,१६८
एकूण: १०,६५४ श्वानांचे लसीकरण




