spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 109 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. त्यानुसार, शुक्रवारी (ता.२४) रोजी उपद्रव शोध पथकाने १०९ प्रकरणांची नोंद करून ६०,१०० रुपयाचा दंड वसूल केला.

यात हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २६ प्रकरणांची नोंद करून १०,४०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत ७ प्रकरणांची नोंद करून रू.७०० चा दंड वसूल करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून रू.२,४०० चे दंड वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत २६ प्रकरणांची नोंद करून २९,००० रुपयांची वसुली करण्यात आली.

चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून १,००० रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास ३३ प्रकरणांची नोंद करून ६,६०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास १० प्रकरणांची नोंद करून रु. १०,००० चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. सदर कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

याशिवाय उपद्रव शोध पथकाने पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या श्री. मोरेश्वर, नवजीवन कॉलोनी, यांच्यावर सी अँड डी साहित्य फुटपाथवर टाकल्याने प्रकरणी रु.५,००० दंड वसूल करण्यात आले. तसेच मे. स्पंदन कला यांनी रस्त्यालगत साहित्य टाकल्या प्रकरणी रू.५,००० दंड वसूल करण्यात आला. तर गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या इतवारीतील झेंडा चौक येथील फराळी भंडार आणि बंगालीपंजा येथील अन्नपूर्णा किराणा यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रु. ५,००० चा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणाऱ्या मे. शुभम मिष्ठान भंडार यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. ५,०००चा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. २४, सूर्यनगर येथील श्री. नरेश गुप्ता यांच्यावर रिकाम्या प्लॉटवर कचरा टाकल्याप्रकरणी रु.५,००० चा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत येणाऱ्या छावणी येथील क्लासिक ग्रो यांच्यावर रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्या प्रकरणी कारवाई करीत रु.१०,००० चा दंड वसूल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी ७ प्रकरणांची नोंद करून रू. ४०,००० दंड वसूल केला. तसेच ३ किलो प्लास्टिक जप्त केले.

Popular Articles